डेटा सायन्स प्रिपरेटरी बूट कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेटा सायन्स प्रिपरेटरी बूट कॅम्प
डेटा सायन्स प्रिपरेटरी बूट कॅम्प

डेटा सायन्स प्रिपरेटरी बूट कॅम्प

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : उद्योगाचे डिजिटायझेशन होत असल्याने डेटा सायन्स डोमेनमध्ये अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत. या वाढत असलेल्या संधींचा लाभ घेऊन हाय सॅलरी जॉब्सचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य आहे. डेटा सायन्स क्षेत्रात फक्त आयटी पार्श्वभूमी असणाऱ्यांनाच जॉब्स मिळतात हा गैरसमज दूर करणारा व बी.कॉम, बी.ए, बी.एससी, बी.ई पदवीधर असणारे तसेच ज्यांना प्रोग्रामिंग व कोडिंगची पार्श्वभूमी नाही असे यांसाठी खास तयार करण्यात आलेला ‘डेटा सायन्स प्रिपरेटरी बूट कॅम्प’ शनिवारी (ता. १७) सुरु होत आहे. यामध्ये पायथन, एसक्यूएल, ईडीए, टॅब्लेयू, पॉवर बीआय आदी मॉड्यूल्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पदवी घेतल्यानंतर नोकरीची प्रतीक्षा न करता ‘जॉब रेडी’ बनवणारे हे प्रशिक्षण स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी डेटा सायन्स क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट इंडस्ट्री एक्स्पर्ट व मेंटॉर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, रिज्यूमे बिल्डिंग आणि प्लेसमेंट सपोर्टसह अत्यंत कमी किमतीत हे मार्गदर्शन असल्याने लवकरात लवकर प्रवेश घेऊन डेटा सायन्सच्या रोमांचक जगात प्रवेश करण्याची संधी आहे. प्रतिव्यक्ती शुल्क १२,५०० रुपये अधिक जीएसटी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०३

---------------------------------------------------------
सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

निर्यातक्षम शेवगा उत्पादन तंत्र आणि निर्यातीच्या संधी
पुणे, ता. ११ : निर्यातक्षम शेवगा उत्पादन कसे घ्यावे, कोणकोणत्या देशात निर्यातीला संधी आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची कार्यशाळा शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) आयोजिली आहे. कमी पाण्यात व कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवगा पिकाची लागवड कशी करावी, शेवग्याच्या वेगवेगळ्या जातींची ओळख, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणीचे व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायन मुक्त उत्पादन, ट्रेसिबिलीटी, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम आदी संदर्भात निर्यातदार तज्ञ मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.

फळे-भाजीपाला डिहायड्रेशन तंत्रज्ञान
फळे, भाजीपाला सुकविण्याच्या प्रक्रियेला डिहायड्रेशन म्हणतात. याद्वारे पाण्याचा अंश काढून फळे-भाजीपाल्याची चव न बदलता त्याची भुकटी करून अधिक काळ टिकविता येते. अशा प्रक्रिया केलेल्या भुकटींना स्थानिक, परदेशी बाजारांतही वाढती मागणी आहे. काय आहे डिहायड्रेशन तंत्रज्ञान, त्याची ओळख, फायदे, ही प्रक्रिया कशी करतात, याचे मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची ऑफलाइन कार्यशाळा शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) आयोजिली आहे. यात प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक मशिनरी, हा व्यवसाय करण्यासाठीच्या संधी, उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक, शासनाच्या अनुदान योजना आदी विषयी मार्गदर्शन होईल. प्रक्रिया उद्योजक, विद्यार्थी, गृहिणींसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.

दोन्ही कार्यशाळांसाठी संपर्कः ९१४६०३८०३१
दोन्ही कार्यशाळांचे ठिकाण सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65783 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..