महाराष्ट्रातून जागतिक ज्युदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन दृष्टिहिन मुलींना मदतीची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातून जागतिक ज्युदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन दृष्टिहिन मुलींना मदतीची गरज
महाराष्ट्रातून जागतिक ज्युदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन दृष्टिहिन मुलींना मदतीची गरज

महाराष्ट्रातून जागतिक ज्युदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन दृष्टिहिन मुलींना मदतीची गरज

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः लखनौ येथे इंडियन ब्लाइंड अँड पॅरा ज्यूदो असोसिएशनने घेतलेल्या निवड चाचणीमधून ४ ते ११ नोव्हेंबर दरम्यान बाकू अझरबैजान येथे होणाऱ्या आयबीएस ज्यूदो वर्ल्ड चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून रेणुका साळवे, सोनाली वाजगे व वृषाली मोरे या दृष्टिहीन मुलींची निवड झाली आहे. या तिनही मुली पुणे अंध शाळेच्या माजी विद्यार्थिंनी असून त्यांना स्पर्धेला जाण्यासाठी व स्पर्धेच्या तयारीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी दानशूरांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वृषाली मोरे हिला गंगासागर राजस्थान येथे झालेल्या दहाव्या राष्ट्रीय अंध ज्यूदो चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच, २०१९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने रजतपदक पटकावले आहे.
राजस्थानमध्ये झालेल्या दहाव्या राष्ट्रीय अंध व मूकबधिर ज्यूदो स्पर्धेतील निवड चाचणीमधून कझाकिस्तान येथील सीनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील मुलींमध्ये रेणुका साळवे या दृष्टिहीन खेळाडूची निवड झाली होती. रेणुका हिला कझाकिस्तान येथील स्पर्धेसाठी जाण्यासाठी दैनिक ‘सकाळ’च्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला समाजातील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. देणगीदारांनी केलेल्या मदतीमुळे रेणुका आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकली. कझाकिस्तान येथील ग्रँड प्रिक्स ज्यूदो स्पर्धेत ती चौथ्या रँकवर राहिली.
आयबीएस ज्यूदो वर्ल्ड चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेणुका, सोनाली व वृषाली भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार आहेत, पण अझरबैजान येथील स्पर्धेला जाण्यासाठी व एकूणच स्पर्धेच्या सर्व तयारीसाठी त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची गरज आहे. तीनही मुलींच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अझरबैजान येथे होणाऱ्या आयबीएस ज्यूदो वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे तिघींचे स्वप्न आहे.


तीनही मुलींना अशी करा मदत
खालील बँक खात्यात आपण आपली मदत थेट पाठवू शकता.
Name :- Sakal Social Foundation
Bank Account No :- ४५९१०४००००२१२५२
Name of Bank:- IDBI bank , Laxmi Road ,Pune.
IFSC Code :- IBKL००००४५९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65784 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..