मिरवणुकीचा खर्च टाळून आरोग्य शिबिरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरवणुकीचा खर्च टाळून आरोग्य शिबिरे
मिरवणुकीचा खर्च टाळून आरोग्य शिबिरे

मिरवणुकीचा खर्च टाळून आरोग्य शिबिरे

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः घोरपडे पेठेतील हनुमान मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी मिरवणुकीचा खर्च टाळत वेगवेगळ्या आरोग्य सेवेच्या शिबिरांचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणी, दंतचिकित्सा, रक्तदान आणि नेत्रतपासणी शिबिरात करण्यात आली. आरोग्य तपासणीत रक्त, लघवीतील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महागड्या किमतीत होणाऱ्या तपासण्या मंडळाने मोफत करून दिल्या. रक्तदान शिबिरात तरुणांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या शिबिराचे उद्‍घाटन रक्ताचे नाते ट्रस्टचे प्रमुख राम बांगड यांच्या हस्ते झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65797 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..