कात्रज परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोका’
कात्रज परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोका’

कात्रज परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोका’

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः कात्रज परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीप्रमुख व त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली.
चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २४, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज), अझरुद्दीन ऊर्फ अजहर दिलावर शेख (वय २२, रा. समर्थ निवास, संतोषनगर, कात्रज), जादेब मेहबूब मुल्ला (वय २७, रा. संतोषनगर, कात्रज), इशान निसार शेख (रा. अंजनीनगर, कात्रज), तौफिक लाला शेख (रा. मांगडेवाडी, कात्रज) अशी मोकानुसार कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
चंद्रकांत ठोंबरे हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने कात्रज परिसरात दहशत निर्माण करीत होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे संबंधित टोळीविरुद्ध मोका कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्फत पोलिस उपायुक्त सागर पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. त्यानुसार, पोलिस आयुक्त गुप्ता यांनी मोका कारवाईस मंजुरी दिली. नऊ महिन्यांत गुप्ता यांनी शहरातील ३० गुंड टोळ्यांविरद्ध तर दीड वर्षात शहरातील ९३ टोळ्यांविरुद्ध मोका कारवाई केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65805 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..