मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या हरियाणातील चोरट्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या हरियाणातील चोरट्यास अटक
मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या हरियाणातील चोरट्यास अटक

मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या हरियाणातील चोरट्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या हरियानातील एका चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, शहरात मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या असून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल आहेत.
सहदेवसिंग चहलसिंग चौहान (वय ३०, रा. सिकंदरपूर, पलवाल, हरियाना) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा कोथरूड परिसरात राहतो. तो मित्रांसमवेत शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बेलबाग चौकात आला होता. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चौहान याने मुलाच्या खिशातील १० हजार रुपयांचा हिसकावला. त्यामुळे मुलाने आरडाओरडा केला. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यास पकडले. चौहान याने विसर्जन मिरवणुकीत आणखी काही जणांचे मोबाईल चोरल्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे.

पाच गुन्हे दाखल
विसर्जन मिरवणुकीत मोबाईल हिसकाविल्याप्रकरणी फरासखाना, विश्रामबाग, वानवडी या पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात एका तरुणीचा ४० हजारांचा मोबाईल चोरट्यांनी चोरुन नेला. तर नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर एका व्यक्तीचा १० हजारांचा मोबाइलही लंपास करण्यात आला. त्याचवेळी शनिवारवाडा परिसरात पेशवे गणपती मंदिरासमोर तरुणाच्या खिशातून पाच हजारांचा मोबाईल चोरट्यांनी काढून घेतला. बेलबाग चौकात एकाचा पाच हजार रुपयांचा, तर वानवडीतील संविधान चौकात विसर्जन मिरवणुकीत नृत्य करणाऱ्याच्या खिशातून ४० हजारांचा मोबाईल चोरट्यांनी चोरुन नेला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65819 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..