कलापिनी कोमकली यांना डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलापिनी कोमकली यांना
डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार
कलापिनी कोमकली यांना डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार

कलापिनी कोमकली यांना डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार’ यंदा प्रख्यात गायिका कलापिनी कोमकली यांना प्रदान करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (ता. १८) डॉ. प्रभा अत्रे यांच्याच हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर व तात्यासाहेब नातू फाउंडेशनचे शारंग नातू यांनी दिली.
टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त व सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाची मैफीलही होणार आहे. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर प्रशांत पांडव साथसंगत करणार आहेत. रसिकांनी या संगीत पर्वणीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन घोटकर व नातू यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65828 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..