दोन दिवसांत पीएमपीला २.५ कोटींचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसांत पीएमपीला २.५ कोटींचे उत्पन्न
दोन दिवसांत पीएमपीला २.५ कोटींचे उत्पन्न

दोन दिवसांत पीएमपीला २.५ कोटींचे उत्पन्न

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः गणेश विसर्जन व त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पीएमपीची मध्यवर्ती भागातील बस सेवा बंद होती, उपनगरात मात्र पीएमपी धावत होती. शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसांत पीएमपीने सुमारे साडे सतरा लाख प्रवाशांची वाहतूक केली. यातून पीएमपीला सुमारे अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दैनंदिन तुलनेत हे कमी जरी असले तरीही उपनगरात बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे यावरून लक्षात येते.
गणेश विसर्जनामुळे पीएमपीच्या सुमारे २५० बस फेऱ्या रद्द झाल्या. दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती होती. शिवाय अनेक ठिकाणी बसचे मार्ग बदलले. त्यामुळे प्रवासी संख्येवर परिणाम होणार हे निश्चित होते.असे असले तरीही पीएमपीने दोन्ही दिवशी चांगल्या रीतीने प्रवासी सेवा दिली.पीएमपीची खंडित सेवा असताना देखील चांगले उत्पन्न मिळविले असल्याची माहिती पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65843 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..