कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर
कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर

कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ‘सकाळ माध्यम समूह आणि ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ यांच्या वतीने ‘राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ’ (NSDC) आणि ‘भारतीय कृषी कौशल्य विकास परिषद’ (ASCI) मान्यताप्राप्त ‘डेअरी फार्म सुपरवायझर’ हा २०० तासांचा (सुमारे दीड महिना) विशेष शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम २९ सप्टेंबरपासून पुणे येथे आयोजिला आहे.
हा अभ्यासक्रम ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेतला जाणार असून प्रशिक्षणात क्लासरूम ट्रेनिंगबरोबरच अद्ययावत डेअरी फार्मवर प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही प्रशिक्षणार्थी यात सहभागी होणार असून हे प्रशिक्षण मराठी तसेच हिंदी भाषेतून खास शासन प्रमाणित मास्टर ट्रेनरद्वारे दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणात शेतकरी, डेअरी फार्म व्यावसायिक, ॲग्री/डेअरी डिप्लोमाधारक, पदवीधारक सहभागी होऊ शकतात. प्रतिव्यक्ती शुल्क ३५ हजार रुपये असून आगाऊ नावनोंदणी केल्यास साडेतीन हजार रुपये सवलत मिळेल.
प्रशिक्षणाचे ठिकाण ः एसआयआयएलसी, सकाळनगर, बाणेर रस्ता, औंध, पुणे
नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१

प्रशिक्षणाद्वारे काय मिळणार :
- आधुनिक तंत्राने डेअरी फार्म बिझनेस यशस्वी करण्याचे कौशल्य
- स्वतःचा डेअरी फार्म योग्यरीत्या हाताळण्याचे कसब
- अद्ययावत डेअरी फार्मवर प्रात्यक्षिकांची संधी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65988 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..