अडीच कोटींचे सोने सराफी पेढीतून चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच कोटींचे सोने
सराफी पेढीतून चोरीस
अडीच कोटींचे सोने सराफी पेढीतून चोरीस

अडीच कोटींचे सोने सराफी पेढीतून चोरीस

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : शहराच्या मध्यवर्ती भागातील सराफी पेढीतून तब्बल अडीच कोटी रुपये किमतीची पाच किलो सोन्याची बिस्किटे चोरणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी खारघरमधून अटक केली. न्यायालयाने महिलेस दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई फरासखाना पोलिसांनी केली.

मुंबईमधील खारघर येथील ३२ वर्षीय महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोपटलाल गोल्ड पेढीचे मालक राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी यांची रविवार पेठेतील सराफ बाजारात पेढी आहे. संशयित आरोपी महिला या सोलंकी यांच्या पेढीत नेहमी सोने खरेदी करण्यासाठी येत असे. त्यानंतर ती खारघरमधील सराफ व्यावसायिकांना सोने विक्री करायची. सोने खरेदी व्यवहारामुळे फिर्यादी सोलंकी यांचा या महिलेशी ओळख झाली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महिला सोलंकी यांच्या पेढीत दागिने खरेदीसाठी आली. तिने त्यांच्याकडून पाच किलो सोन्याची बिस्किटे खरेदी केली. रोख रक्कम बॅंक खात्यात जमा करते, असे तिने सोलंकी यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या दुकानासमोर लावलेल्या कारमध्ये बिस्किटे ठेवून येते, असे सांगत महिला तेथून पसार झाली. त्यानंतर सोलंकी यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर महिला खारघर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी महिलेला खारघरमधून अटक केली. महिलेस न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66021 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..