सर परशुराम महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर परशुराम महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्‍घाटन
सर परशुराम महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्‍घाटन

सर परशुराम महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील विज्ञान मंडळाचे उद्‍घाटन नुकतेच करण्यात आले. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ डॉ. संजीव धुरंधर उपस्थित होते.
विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ. संदीप काकडे यांनी विज्ञान मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कल्पना रुजविण्यासाठी विज्ञान मंडळाचे महत्त्व सांगितले. डॉ. धुरंधर यांनी ‘गुरुत्वाकर्षण लहरी’ या विषयावर व्याख्यान दिले. विकास व नियोजन या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. डॉ. विद्या अवसरे आणि महासचिव आदित्य गागरे, आयुष मोकाशी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. मनीषा मोडक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन किशोर शास्त्री यांनी केले तर डॉ. श्रीकांत मुसळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66145 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..