अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

प्रकाश इनामदार करंडक एकांकिका स्पर्धेला सुरुवात
पुणे, ता. १२ ः ‘‘स्पर्धेत सहभागी होताना केवळ बक्षीस मिळविणे, असा उद्देश नसावा. त्या स्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे, अशी शिकवण आम्हाला मिळाली. पण आता स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर बक्षिसे किती मिळतात, याकडेच जास्त लक्ष दिले जात आहे’’, असे मत युवा अभिनेते सौरभ गोखले यांनी व्यक्त केले. विजय पटवर्धन फाउंडेशनतर्फे आयोजित विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, फाउंडेशनच्या अध्यक्षा वृषाली पटवर्धन, विजय पटवर्धन आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून २४ संघ सहभागी झाले असून शुक्रवारपर्यंत (ता. १६) सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा रंगणार आहे. राजेभोसले, इनामदार यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय पटवर्धन यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली. आशुतोष नेर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर वादविवाद स्पर्धेचे आयोजन
पुणे, ता. १२ ः रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्यातर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे हे १५ वे वर्ष असून २५ सप्टेंबरला ही स्पर्धा फर्ग्युसन महाविद्यालयातील अॅम्फी थिएटर येथे होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास लेखनात क्रांतिकारकांवर नेहमीच अन्याय होत गेला आहे’ हा विषय स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे. अधिकाधिक स्पर्धकांनी १७ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाची वार्षिक सभा
पुणे, ता. १२ ः डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा व असोसिएशन दिन नुकताच पार पडला. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह डॉ. भास्कर हर्षे, सहकार्यवाह सतीश राजपाठक तसेच डॉ. अमित वाळिंबे, परीक्षित देवल, डॉ. नीलेश कुलकर्णी, डॉ. सोनाली भोजने, डॉ. रमेश दामले, डॉ. सुचेता अय्यर, मेघा पटवर्धन आदी उपस्थित होते. सभेनंतर दि हिमालयन क्लब, पुणे आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ध्येयस्पर्श’ कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमात दि हिमालयन क्लबचे सेक्रेटरी डॉ. रघुनाथ गोडबोले यांनी गिरीप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक कृष्णा ढोकले आणि जितेंद्र गवारे यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकेशा सातवळेकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66151 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..