असुविधांबाबत विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असुविधांबाबत विद्यार्थ्यांचा
तीव्र आंदोलनाचा इशारा
असुविधांबाबत विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

असुविधांबाबत विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठातील विविध पायाभूत सुविधांची अवस्था अत्यंत खालच्या स्तरावर पोचल्या असून, त्यांची तातडीने दखल घेण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला आहे. यासंबंधी त्यांनी कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अभाविपचे विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा, उपाध्यक्ष वैभव मुंडे, सत्यजित आडे, गौरव महाजन, वरद पाटील आदी उपस्थित होते. वसतिगृहाची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, खानावळीच्या समस्या, इंटरनेटच्या सुविधा आदींबद्दल कुलसचिवांना निवेदन देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या
- खानावळीतील भोजनाचा दर्जा वाढवावा व भोजन गुणवत्ता समिती नेमण्यात यावी
- विद्यापीठातील इंटरनेट सुविधा सुधारण्यात यावी
- वसतिगृह प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची वसतिगृहअभावी गैरसोय होत आहे
- उपाहारगृहात बसण्यासाठी आसन व्यवस्था वाढवण्यात यावी
- विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी
- सिंथेटिक मैदान विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात यावे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66155 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..