कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम
कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम

कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : कुष्ठरोग व क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात येत्या मंगळवारपासून (ता. १३) रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ३०) आशा (अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हीस्ट) आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासह माहिती घेणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. एच. ऐ. पोटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे, जिल्हा परिषदेचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन एडके उपस्थित होते.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन रुग्ण रोगाच्या सुरवातीच्या टप्प्यातच ओळखून उपचाराखाली यावा यासाठी सर्व नागरिकांना याबाबतची प्राथमिक माहिती सातत्याने देण्यात येत आहे. कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत आरोग्य शिक्षण, लवकर निदान, लवकर उपचार याप्रमाणे नियोजन करून रोगप्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान कालावधीत घरोघरी तपासणी करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

दृष्टीक्षेपात पुणे जिल्ह्यातील क्षयरोग
- ऑगस्ट २०२२ पर्यंत उपचाराखाली असलेले कुष्ठरुग्ण : ६२९
- कुष्ठरोग दर : प्रति दहा हजार लोकसंख्येत ०.५३
- एप्रिल ते ऑगस्ट २०२२ अखेर नव्याने भर पडलेल्या रुग्णांची संख्या : २०९

अशी राबविणार शोधमोहीम
संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियानात जिल्ह्यात ४ हजार ११७ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरी व ग्रामीण भागातील मिळून ५६ लाख लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66165 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..