८०० किलोचे बनावट पनीर जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

८०० किलोचे बनावट पनीर जप्त
८०० किलोचे बनावट पनीर जप्त

८०० किलोचे बनावट पनीर जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : बनावट पनीर तयार करणाऱ्या आणखी एका पनीरच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. या कारवाईत तीन लाख २९ हजार २५४ रुपये किमतीचा बनावट पनीर व अन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. ‘एफडीए’ पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी सोमवारी ही माहिती दिली.

नारागुडे म्हणाले, ‘‘वानवडी येथील टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस् येथे छापा टाकल्यानंतर कारखान्यात बनावट पनीर तयार करण्यात येत असल्याचे आढळले. त्यामुळे पनीरचा साठा जप्त करण्यात आला. हा कारखाना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचेही तपासणीतून पुढे आले.’’ कारखान्यावर छापा टाकला असता ८०० किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले. त्यासाठी ३५० किलो स्किम्ड मिल्क पावडर व २७० किलो पामोलिन तेल साठविल्याचे दिसले. पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहे.

या कारखान्यातील एक लाख ६७ हजार ७९० रुपये किमतीचे ७९९ किलो पनीर, एक लाख २१ हजार ८०० रुपये किमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३९ हजार ६६४ रुपये किमतीचे २६८ किलो आरबीडी पामोलिन तेल असा एकूण तीन लाख २९ हजार २५४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहायक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तक्रारीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66177 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..