एमपीएससी विद्यार्थ्यांकडून ५० हजार ट्विट, रिट्विट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससी विद्यार्थ्यांकडून
५० हजार ट्विट, रिट्विट्स
एमपीएससी विद्यार्थ्यांकडून ५० हजार ट्विट, रिट्विट्स

एमपीएससी विद्यार्थ्यांकडून ५० हजार ट्विट, रिट्विट्स

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२ ही परीक्षा एकूण एक हजार पदांसाठी घेण्यात यावी, या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. १२) सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ट्विटर जागृती मोहीम राबविली. या मोहिमेला सुमारे ५० हजारांहून अधिक ट्विट व रिट्विट्स केले असल्याची माहिती शुभम पाटील या विद्यार्थ्याने दिली.
राज्य सेवा मुख्य २०२२ ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहूपर्यायी पद्धतीने शेवटची परीक्षा होणार आहे. त्यामुळे पदांमध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत ‘#राज्यसेवा2022जागावाढ’ हा हॅशटॅगचा वापर केला. सध्या २१ संवर्गातील ५०१ पदांसाठी ही परीक्षा होत असून उर्वरित ११ संवर्गाचे एकाही पदाचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवलेले नाही. नायब तहसीलदार पदाची शेकडो पदे राज्यात रिक्त आहेत. तरीही २०१९ पासून एकही मागणीपत्र पाठवलेले नाही. असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच मुख्याधिकारी गट ‘ब’ची १०० पेक्षा अधिक पदे रिक्त असून, उद्योग उपसंचालक, उद्योग अधिकारी, नायब तहसीलदार, सरकारी कामगार अधिकारी, कामगार आयुक्त, अधीक्षक व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे, अशी मागणी केली आहे. या मोहिमेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ता रविकांत वरपे यांनी केले.

राज्यसेवेच्या जागा वाढविण्याची व सर्व भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत करण्याची विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे. शासनाने त्वरित दखल घ्यावी, केरळच्या धर्तीवर सर्वच भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने एमपीएससीमार्फत घेण्याच्या प्रक्रियेला ब्रेक न लावता अधिक गती द्यायला हवी.
- रोहित पवार, आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66224 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..