"चुहा गॅंग''च्या टोळीप्रमुखासह साथीदारांविरूद्ध "मोका''नुसार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"चुहा गॅंग''च्या टोळीप्रमुखासह साथीदारांविरूद्ध "मोका''नुसार कारवाई
"चुहा गॅंग''च्या टोळीप्रमुखासह साथीदारांविरूद्ध "मोका''नुसार कारवाई

"चुहा गॅंग''च्या टोळीप्रमुखासह साथीदारांविरूद्ध "मोका''नुसार कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः भारती विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चुहा गॅंगच्या टोळीप्रमुखासह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले.
ईस्माईल मौलाली मकानदार (वय २६), जावेद मेहबूब मुल्ला (वय २७) व तौसिफ ऊर्फ मोसिन ऊर्फ चुहा जमीर सैय्यद (वय २८, तिघेही रा. संतोषनगर, कात्रज) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकानदार हा सराईत गुन्हेगार असून तो त्याच्या साथीदारांसमवेत कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होते. त्यादृष्टीने त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, जमाव जमविणे, दहशत माजविणे या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतरही आरोपींमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा नव्हती. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी संबंधित टोळीप्रमुख व त्यांच्या साथीदारांविरुद्ध ‘मोका’नुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यावतीने अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे पाठविला. त्यानुसार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास मंजुरी दिली. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी आत्तापर्यंत ‘मोका’नुसार केलेली ही ९३वी कारवाई आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66241 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..