पीएमपीची दिवसभरात १ कोटी ९५ लाखांची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीची दिवसभरात १ कोटी ९५ लाखांची कमाई
पीएमपीची दिवसभरात १ कोटी ९५ लाखांची कमाई

पीएमपीची दिवसभरात १ कोटी ९५ लाखांची कमाई

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः पीएमपीला सोमवारी सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झाले असून सुमारे १४ लाख प्रवाशांनी पीएमपीच्या बसमधून प्रवास केला. यातून पीएमपीला सुमारे १ कोटी ९५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. हा आकडा गेल्या चार वर्षातला सर्वाधिक आकडा आहे. शिवाय हा आकडा रक्षाबंधनच्या दिवशी व अन्य सण, उत्सवाच्या दिवशी मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेतदेखील अधिक असल्याचे पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने पीएमपीला आर्थिक फटका बसला होता. शिवाय शुक्रवार, शनिवार दोन्ही दिवशी गणेश विसर्जन असल्याकारणाने देखील फेऱ्या रद्द होत्या. रविवारी सुट्टी असल्याने प्रवाशी संख्या कमी होती. सोमवार हा कामाचा पहिला दिवस असल्याने सकाळपासूनच विविध मार्गावर धावणाऱ्या बसला प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद होता. सकाळच्या सत्रात १ कोटी १२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले तर दुपारच्या सत्रांत ८३ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. सोमवारी एका दिवसांत १ कोटी ९५ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले. सुमारे १,४६० बस प्रवासी सेवेत धावल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66260 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..