‘हसरी संध्याकाळ’ कार्यक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हसरी संध्याकाळ’ 
कार्यक्रमाचे आयोजन
‘हसरी संध्याकाळ’ कार्यक्रमाचे आयोजन

‘हसरी संध्याकाळ’ कार्यक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः ‘नवचैतन्य हास्ययोग‌ परिवार, नांदेड सिटी’ यांच्यातर्फे सातव्या वर्धापनदिनानिमित्त प्रभाकर निलेगांवकरा यांच्या ‘हसरी संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी श्रोत्यांना भरपूर हसवत आणि प्रबोधन करत हास्यक्लब सभासदांची मने जिंकली. ‘आपलं जीवन म्हणजे एक इंद्रधनुष्य आहे. सूर्याची किरणे पावसाच्या थेंबात जशी सुंदर वीण घालतात, त्यातून होणाऱ्या परावर्तनाने इंद्रधनुष्य तयार होते, तसे सुखदुःखाच्या वीणेतून आपल्या जीवनाचे इंद्रधनुष्य तयार होते’, असे मत निलेगांवकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन हास्यक्लबच्या अध्यक्षा वनमाला संकाये व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. ललिता काटे यांनी संयोजन केले. या कार्यक्रमासाठी नांदेड सिटी संचालक ॲड. नरसिंग दगड, अध्यक्ष विठ्ठल काटे, उपाध्यक्ष विजय भोसले, मकरंद टिल्लू, प्रा. नि. ब. संकाये आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22s09246 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..