अतिवृष्टीतग्रस्तांना त्वरित भरपाई द्या ः कोलते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीतग्रस्तांना त्वरित भरपाई द्या ः कोलते
अतिवृष्टीतग्रस्तांना त्वरित भरपाई द्या ः कोलते

अतिवृष्टीतग्रस्तांना त्वरित भरपाई द्या ः कोलते

sakal_logo
By

पुणे, ता.१३ : राज्यात जून ते १२ सप्टेंबर या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ३५ लाख शेतकऱ्‍यांचे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांसाठी साडेतीन हजार कोटींची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र शेतकऱ्‍यांना अद्याप ही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने त्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्‍यांच्या खात्यांवर जमा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते. शेतकऱ्‍यांना मशागतीसाठी, पावसामुळे वाहून गेलेली जमीन दुरुस्तीसाठी, खते व बियाणे यासाठी वाढीव नुकसान भरपाई द्यावी. नियमित कर्ज भरणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना ५० हजार अनुदान त्वरित द्यावे, शेत जमिनीची दुरुस्ती महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) पूर्ण करावीत या व आदी मागण्या यावेळी कोलते यांनी केल्या.
भाजपच्या आयटी सेलमार्फत दररोज परधर्माचा द्वेष करणारे संदेश समाज माध्यमातून पसरवले जात आहेत. भाजपच्या आमदार, खासदार आणि मंत्री धार्मिक विद्वेषाची वक्तव्य करत आहेत. भाजपकडून सबका साथ सबका विकास हा फसवा नारा देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी यावेळी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22w94531 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..