चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन
चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘श्री शिवाजीनगर गावठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट’ने चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धादेखील घेण्यात आली. या स्पर्धेत ७० लहान मुलांनी व महिलांनी सहभाग घेतला. मंडळ यंदा ८३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. महेश दुर्गे व श्यामकांत भालेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. मंडळाच्या विश्वस्त मंडळातील राहुल शिरोळे, अनिल बहिरट, माणिक दुर्गे, गिरीश बहिरट, सुनील सांडभोर आणि उमेश गोरे या वेळी उपस्थित होते.

89665
शिवाजीनगर : ‘श्री शिवाजीनगर गावठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट’च्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22x00227 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..