गावी गेल्याचे पाहून चोरट्याचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावी गेल्याचे पाहून चोरट्याचा 
सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
गावी गेल्याचे पाहून चोरट्याचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

गावी गेल्याचे पाहून चोरट्याचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः बिबवेवाडीतील एका सोसायटीमधील रहिवासी गणपती विसर्जनासाठी मूळ गावी गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या मागील सोसायटीत घडली. या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी फिर्यादी सदनिकेला कुलूप लावून मूळ गावी गेले होते. याचाय गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचा कडीकोयंडा तोडून बेडरुममधील लाकडी कपाटातील ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. गावावरून परतल्यावर घरात चोरी झाल्याचे समजताच फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.

मोबाइल शॉपीचे शटर उचकटून चोरी
पुणे, ता. १३ ः पाटील प्लाझा मित्र मंडळ चौकातील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी १४ मोबाईल, ९ चार्जर, केबल, ब्लू-टूथ, रोख रक्कम असा दोन लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ६ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत दुकानचालक प्रशांत नगरे (वय ३३, रा. सिंहगड रस्ता) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22x61349 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..