भीती दाखवून विद्यार्थ्याची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीती दाखवून विद्यार्थ्याची फसवणूक
भीती दाखवून विद्यार्थ्याची फसवणूक

भीती दाखवून विद्यार्थ्याची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः ‘मी खडकी पोलिस ठाण्याचा सहायक पोलिस निरीक्षक’ (एपीआय) आहे. तू तुझ्या रुमवर मुला-मुलींना आणतो, अशी तुझ्याविरुद्ध तक्रार आली आहे,’ असे खोटे सांगून, तसेच शिवीगाळ करून २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी नऱ्हे येथील एका २० वर्षाच्या तरुणाने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुण हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून एका सदनिकेमध्ये राहतो. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता एकजण त्याच्या रुमवर आला. फिर्यादी यांना पोलिस ठाण्यात नेऊन कारवाई करण्याची भीती दाखवून ‘तू रुमवर मुला मुलींना आणतो’, अशी तक्रार असल्याचे सांगून २० हजार रुपये घेऊन लुबाडले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y00992 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..