सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे सोमवारी उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय
मॅरेथॉनचे सोमवारी उद्‍घाटन
सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे सोमवारी उद्‍घाटन

सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे सोमवारी उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच उद्‍घाटन भारताचे लष्करप्रमुख आणि लडाखचे नायब राज्यपाल यांच्या हस्ते १९ सप्टेंबर रोजी कारगिलमध्ये होणार आहे. मॅरेथॉनचे हे पाचवे वर्ष असून, ही मॅरेथॉनचे ‘रन फॅार अ‍ॅप्रिकॉट’ या संकल्पनेवर आधारित आहे.
सरहद संस्थेच्या वतीने कारगिलला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून प्रतिवर्षी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथुर यांच्या हस्ते तसेच १२१ ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर वाय. एस. सेखो यांच्या उपस्थितीत सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे उद्‍घाटन होणार आहे. या मॅरेथॉनचे मुख्य संयोजक संजीव शहा आणि डॉ. शैलेश पगारिया यांनी ही माहिती दिली.
या मॅरेथॉनला अ‍ॅथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने मान्यता दिली आहे. मॅरेथॉनचे आयोजन सरहद संस्थेसह लडाख अ‍ॅटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल, कारगिल आणि लडाख पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे समन्वयक आंतरराष्ट्रीय पंच वसंत गोखले आणि सुमंत वाईकर हे मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर आहेत.
या मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील दोन हजारपेक्षा अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. पाच किमी, १० किमी, हाफ मॅरेथॉन, फूल मॅरेथॉनमध्ये विविध गटांसाठी आठ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. मॅरेथॉनच्या पूर्वतयारीसाठी कौन्सिलचे चेअरमन फिरोज खान, कौन्सिलचे आगा सय्यद, कारगिलचे जिल्हाधिकारी संतोष सुखदेवे आणि लडाख पोलिस प्रमुख सतीश कंधारे विशेष परिश्रम घेत आहेत, अशी माहिती सरहद कारगिल इंटरनॅशनलच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y07517 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..