डॉक्टरांवरील आरोपपत्र मागे घेण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टरांवरील आरोपपत्र
मागे घेण्याची मागणी
डॉक्टरांवरील आरोपपत्र मागे घेण्याची मागणी

डॉक्टरांवरील आरोपपत्र मागे घेण्याची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण प्रकरणात डॉक्टरांवर केलेले आरोपपत्र तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) पुणे शाखेतर्फे करण्यात आली आहे.
कोणतेही बेकायदेशीर प्रकार घडू नये, असे अपेक्षित आहे. पण, त्याच वेळी रुग्णाचा जीवरक्षक शस्त्रक्रिया व त्याचा जगण्याचा हक्क डावलला जाऊ नये, असेही ‘आयएमए’ने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. किडनी प्रत्यारोपणप्रकरणी डॉक्टर आणि रूबी हॉल क्लिनिक यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमिवर ‘आयएमए’ने पत्रक प्रसिद्ध केले आहे.
संबंधित महिलेने मध्यस्थांच्या मदतीने स्वतःचे बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारावर रुग्णालय समितीने मान्यता दिली. त्याच आधारावर पोलिसांकडून पडताळणी झाली आणि जिल्हास्तरावरील सरकारी प्रत्यारोपण समितीनेही मान्यता दिली. त्या आधारावर शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे यात डॉक्टर किंवा रुग्णालयातील अनियमितेचा काहीही संबंध दिसत नाही. शस्त्रक्रियेची आवश्यकता निश्चित करणे, शस्त्रक्रिया योग्य व्यक्तीवर प्रमाणित रुग्णालयात होत आहे ना आणि वैद्यकीय उपचार योग्य पद्धतीने होणार आहेत ना, हे डॉक्टरांचे काम असते. संबंधित व्यक्तीने सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत, हे तपासण्याचे काम डॉक्टरांचे नाही. त्यामुळे या बनावट कागदपत्रे आणि किडनी रॅकेट प्रकरणात व त्या कटात सहभागी असल्याचे समजून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणे अयोग्य असल्याचा याचा निषेध ‘आयएमए’ने केला आहे.
‘आयएमए‘ पुणे शाखेच्या अध्यक्ष डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. अविनाश भुतकर, डॉ. संजय पाटील, डॉ. पद्मा अय्यर, डॉ. अलका क्षीरसागर, डॉ. गीतांजली शर्मा यांनी या पत्रकावर स्वाक्षरी केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11007 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top