अष्टपैलू अभिनेता पुष्कर जोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अष्टपैलू अभिनेता पुष्कर जोग
अष्टपैलू अभिनेता पुष्कर जोग

अष्टपैलू अभिनेता पुष्कर जोग

sakal_logo
By

आपल्या नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर वंडर बॉय ही उपाधी वयाच्या पाचव्या वर्षी मिळवणाऱ्या पुष्कर जोगने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. तसेच अनेक मालिका, रिॲलिटी शोज आणि सूत्रसंचालन अशा अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. अभिनयासोबतच नवनवीन कलाकृती निर्मितीचा ध्यास पुष्करने घेतला आहे. आत्तापर्यंत त्याने तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि त्याची बहुतांश शूटिंग लंडनमध्ये पार पडले. लॉक डाउनच्या काळात ‘वेल डन बेबी’ चित्रपटाची निर्मिती पुष्करने केली होती. एका नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित झाला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता त्याचा आगामी चित्रपट ''अदृश्य'' प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे, तसेच, त्याचे आगामी दोन चित्रपट तयार आहेत.
पुष्करला वाटते की, आजचा प्रेक्षक बदलला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कंटेंट आता ओटीटीवर उपलब्ध असल्यामुळे त्यांची चॉईस देखील बदलली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना तसेच चित्रपटाची निवड करताना या सर्व बाबींचा नक्कीच विचार करावा लागतो. २०२२ या वर्षात पुष्करचे तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘अदृश्य’, ‘तमाशा लाइव्ह’ आणि `व्हिक्टोरिया’ तसेच एका चित्रपटाचे शूटिंग लंडन येथे सुरु होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11214 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top