बुद्ध पौर्णिमेनिमित्त चित्रकला मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चित्रकला मेळावा
बुद्ध पौर्णिमेनिमित्त चित्रकला मेळावा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चित्रकला मेळावा

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. पाटील इस्टेट, नागपूर चाळ, हौसिंग बोर्ड व गांधीनगर-जयप्रकाशनगर परिसरातील मुलांनी ‘व्यसनाधीनता’ या विषयावर वेगवेगळी चित्र काढली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनोदय संस्था वस्तीमधील तरुणांसोबत काम करते. चित्र काढलेल्या मुलांचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी कौतुक केले. या उपक्रमात ७५ मुलांनी सहभाग घेतला. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, समुपदेशक अक्षय कदम, कार्यक्रमाचे समन्वयक मैत्रेयी पाध्ये आणि प्रज्ञा जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11268 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top