अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून नोंदणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अयोध्येला जाण्यासाठी 
मनसेकडून नोंदणी सुरू
अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून नोंदणी सुरू

अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून नोंदणी सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जून रोजी अयोध्याला जाणार आहे. त्यांच्यासमवेत जाण्यासाठी मनसेने शहरातील कार्यकर्त्यांच्या नाव नोंदणीस मंगळवारपासून सुरुवात केली. दरम्यान, ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख, जागा निश्चित झाल्यावर ते स्वतः याबाबत ट्विटरवरून माहिती देणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

मुंबईतून मनसे कार्यकर्त्यांनी अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या धर्तीवर पुण्यातही पक्षाच्या शहर कार्यालयात नावनोंदणीस प्रारंभ झाला आहे. कार्यकर्त्यांकडून आधारकार्डची छायांकित प्रत घेऊन अर्ज भरून घेतले जात असून त्यांच्या संख्येवर रेल्‍वेगाड्या आरक्षित करण्याचे नियोजन सुरु आहे. तसेच ठाकरे यांची शहरात अल्पावधीतच जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी तीन जागांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एक जागा निश्चित झाल्यावर सभेचे स्थळ, तारीख आणि वेळ हे ठाकरे स्वतःच ट्विटरवरून जाहीर करणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11275 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top