अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुद्ध जयंती साजरी
पुणे ः भारतीय बौद्ध महासभेतर्फे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी केली. भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंचशील ध्वजारोहन संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष के. बी. मोटघरे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉक्टर विलास आढाव यांनी ‘धार्मिक चळवळीकडे तरुण वर्गाची उदासीनता का? त्यावर उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. रोहिणी वनशिव, प्रभा कांबळे, शारदा मोरे, चंद्रा मोहिले, आत्माराम सोनवणे, प्रशांत रणपिसे, डॉ. सुरेश कठाणे, ॲड. अशोक भेंडे, सचिन भालेराव, आदी उपस्थित होते. रामदास सोनवणे, संतोष चव्हाण, एकनाथ जाधव, सुभाष जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालक दिलीप धाईजे यांनी केले. प्रास्ताविक राजकुमार गायकवाड यांनी केले. यशवंत धनविजय यांनी आभार मानले.

भिसे यांना प्रतिभा रत्न पुरस्कार
पुणे ः मनुष्यबळ विकास लोकसेवा ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्ते विनायक भिसे यांना सामाजिक कार्याबद्दल भारत ज्योती राष्ट्रीय प्रतिभा रत्न पुरस्कार -२०२२ प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल आयकॉन डॉ. जे. सानिपीना राव आणि श्याम सुंदर सोन्नर महाराज (आळंदीकर) यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी डॉ. शुभदा जोशी, प्रकाश सावंत, मिनाक्षी गवळी, मनीषा कदम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अँड. कृष्णा जगदाळे यांनी केले.

PNE22S64888

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11300 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top