अभिनेत्री उषा चव्हाण यांचे पत्र; शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून खोदाई बाळासाहेबांचे मावळे असूच शकत नाहीत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री उषा चव्हाण यांचे पत्र; शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून खोदाई
बाळासाहेबांचे मावळे असूच शकत नाहीत!
अभिनेत्री उषा चव्हाण यांचे पत्र; शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून खोदाई बाळासाहेबांचे मावळे असूच शकत नाहीत!

अभिनेत्री उषा चव्हाण यांचे पत्र; शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून खोदाई बाळासाहेबांचे मावळे असूच शकत नाहीत!

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जांभळी येथील शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून तेथे खोदाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
‘‘बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्ती राज्यात एखाद्याचे शेतच सुरक्षित राहात नसेल, तर घर तरी कसे सुरक्षित राहील, याची काळजी वाटते? बाळासाहेबांनी नेहमी महिलांचा आदर केला आहे. महिलांना त्रास होऊ नये, याची ते पुरेपुर काळजी घेत होते. त्यातही माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या स्नेहपरिवारातील अभिनेत्रीला असा त्रास दिला जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे असे असूच शकत नाहीत’’, अशा शब्दात उषा चव्हाण यांनी पत्राद्वारे आवाज उठविला आहे.
याप्रकरणी राजेंद्र धनकुडे याच्यासह जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हृदयनाथ दत्तात्रय कडू (वय ५२, रा. ट्रेझर पार्क, सातारा रस्ता) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडू हे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण-कडू यांचे चिरंजीव आहे. उषा चव्हाण यांनी १९९९ मध्ये हवेली तालुक्‍यातील जांभळी येथे गट क्रमांक ३३५ मध्ये साडेसहा एकर जागा सीताराम पवार यांच्याकडून खरेदी केली होती. संबंधित जागेवर कडु यांच्या कुटुंबातील सदस्य वेळोवेळी पाहणी करून देखभाल करीत असत. दरम्यान, त्यांनी धर्मराज शिवाजी गडदे (वय ३३, रा. जांभळी) यांना त्यांच्या जागेतील माळरान गायी परवानगी दिली आहे. दरम्यान, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी फिर्यादीच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याबाबत विचारणा केली होती. त्यास फिर्यादी यांनी विरोध दर्शवून, जलवाहिनी रस्त्याच्याकडेने करण्याबाबत सांगितले. रविवारी दुपारी, फिर्यादी यांना गडदे यांनी फोन करून त्यांच्या जागेत जेसीबी आणण्यात आला असून तेथे खोदाई सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी, त्यांची मुले व आई घटनास्थळी गेले. तेव्हा, त्यांना त्यांच्या जमीनीमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ उत्तमनगर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तेव्हा, त्यांच्या जमिनीत ४०० फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट खोल चर केली असल्याचे आढळले.

वहिवाटीचा रस्ताही केला बंद
वहिवाटीसाठी गेलेला रस्ता उकरून बंद केला आहे, याबरोबरच त्यांच्या जागेतील दगडाच्या ताली, लोखंडी तारेके कुंपण, सिमेंट व लोखंडाच्या खांबांची तोडफोड केल्याचे पोलिसांना आढळून आले. धनकुडे यांनी फिर्यादी यांची कुठलीही परवानगी न घेता, त्यांच्या जागेत घुसून चर खोदण्याचे काम केले आहे. दरम्यान, याबाबत धनकुडे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11306 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top