प्रभाग निहाय नकाशे प्रसिध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग निहाय नकाशे प्रसिध्द
प्रभाग निहाय नकाशे प्रसिध्द

प्रभाग निहाय नकाशे प्रसिध्द

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर चार दिवसानंतर निवडणूक आयोगाने आज (ता. १७) प्रभागनिहाय नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. त्यामुळे प्रभाग रचनेत नेमके कसे आणि कुठे बदल झाले, हे स्पष्ट समजणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणूकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेत आडवे-तिडवे प्रभाग केले होते, नैसर्गिक हद्दींचे पालनही केले नव्हते. या प्रभाग रचनेमुळे अनेक इच्छुकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्यामध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी हरकती नोंदविल्या होत्या. निवडणूक आयोगाने १३ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली, पण प्रभागात बदल केल्याचे नकाश उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे नेमके प्रभाग कसे बदलले, याची माहिती मिळत नव्हती. अधिसूचना वाचून बदल समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
निवडणूक आयोगाने आज प्रभागनिहाय नकाशे जाहीर केले आहेत. त्यात ५८ पैकी ३२ प्रभागात बदल केले असल्याने ते बदल कसे आहेत, याची उत्सुकता लागली आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागनिहाय नकाशे उपलब्ध केले आहेत. तसेच, महापालिका मुख्य इमारत व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नकाशे पहाण्यासाठी उपलब्ध आहेत.
- डॉ. यशवंत माने,
उपायुक्त निवडणूक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11314 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top