चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) झपूर्झा
‘झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालया’च्या उद्‍घाटनानिमित्त चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रेवा नातू यांचे गायन, शर्वरी जमिनीस यांचे नृत्य, आनंद भाटे यांचे गायन, ‘अडलंय का’ हे नाटक, ‘इर्शाद’ ही कवितांची मैफील, शेखर नाईक यांचा अमृता शेरगील यांच्यावरील कार्यक्रम आणि पं. अतुलकुमार उपाध्ये व विजय घाटे यांचा कार्यक्रम, राहुल देशपांडे यांचे गायन आदींचा समावेश आहे.
कधी ः गुरुवार ते रविवार (ता. १९ ते २२)
केव्हा ः दुपारी एक वाजेपासून
कुठे ः झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय, खडकवासला बॅकवॉटरजवळ, कुडजे

३) विशेषांक प्रकाशन
‘एकता’च्या मासिकाच्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ व ‘शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे’चे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शांतीश्री पंडीत यांचा नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.
कधी ः शनिवार (ता. २१)
केव्हा ः सकाळी १०.३० वाजता
कुठे ः पत्रकार भवन, नवी पेठ

३) संगीत कार्यक्रम
पं. गोविंदराव देसाई यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ गायिका मधुवंती देव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांना संवादनीवर उपेंद्र सहस्रबुद्धे तर तबल्यावर अविनाश पाटील साथसंगत करणार आहेत.
कधी ः रविवार (ता. २२)
केव्हा ः सकाळी ९ वाजता
कुठे ः गोपाळ गायन समाज, टिळक रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11481 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top