तरी असेल गीत हे कार्यक्रमाचे सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरी असेल गीत हे कार्यक्रमाचे सादरीकरण
तरी असेल गीत हे कार्यक्रमाचे सादरीकरण

तरी असेल गीत हे कार्यक्रमाचे सादरीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : कोथरूड विकास मंचातर्फे लता मंगेशकर व शांता शेळके यांना मानवंदना देणारा ‘तरी असेल गीत हे’ हा सांगीतिक कार्यक्रम नुकताच सादर करण्यात आला. गोल्डन मेमरीज या संस्थेच्या कलाकारांनी कार्यक्रम सादर केला. लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने स्वरबद्ध केलेली काही गाणी, त्यांनी गायलेली अजरामर गाणी आणि शांता शेळके यांनी लिहिलेली सदाबहार गाणी या वेळी कलाकारांनी पेश केली. चैत्राली अभ्यंकर, शशांक दिवेकर यांच्यासह प्रसन्न बाम, ओंकार पाटणकर, राजेंद्र हसबनीस, ऋतुराज कोरे हे कलाकार यात सहभागी झाले होते. रवींद्र खरे यांनी निवेदन केले. कोथरूड विकास मंचाच्या आंबा महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जहाँगीर हॉस्पिटलच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरही राबविण्यात आल्याची माहिती मंचाचे संस्थापक अध्यक्ष योगेश राजापूरकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कांचन कुंबरे व अश्विनी भालेकर यांचाही सहभाग होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11490 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top