करार संपल्याने वाकडेवाडी बस स्थानकाचे होणार काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करार संपल्याने वाकडेवाडी बस स्थानकाचे होणार काय?
करार संपल्याने वाकडेवाडी बस स्थानकाचे होणार काय?

करार संपल्याने वाकडेवाडी बस स्थानकाचे होणार काय?

पुणे - वाकडेवाडी बस स्थानकाच्या जागे संदर्भात एसटी व मेट्रो प्रशासन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. जून महिन्यांत एसटी सोबतचा करार संपणार आहे. तो करार वाढविण्यास मेट्रो तयार नाही. त्यामुळे मेट्रो प्रशासन शिवाजीनगर बस स्थानकाची रिकामी जागा एसटीला परत देत आहे. त्याच वेळी आत्ताच्या वाकडेवाडी बस स्थानकाची जागा देखील ‘आरे’ला परत केली जाणार आहे. मात्र एका महिन्यांत बस स्थानकाचे स्थलांतर व नव्याने बस स्थानकाची उभारणी ही केवळ अशक्य बाब आहे. त्यामुळे वाकडेवाडी बस स्थानकाचे होणार काय? प्रवाशांनी जायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय आहे नेमका प्रश्‍न?

- मेट्रोने शिवाजीनगरचे भुयारी स्थानक बांधण्यासाठी शिवाजीनगर बस स्थानकाची जागा तीन वर्षांसाठी ताब्यात घेतली

- त्या बदल्यात एसटीला वाकडेवाडीची आरे दुधडेयरीची जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली

- या बदल्यात मेट्रोच एसटीचे भाडे आरेकडे भरत आहे

- दरमहा पन्नास लाख रुपये इतके हे भाडे आहे

- शिवाजीनगरचे बस स्थानक पीपीपी मॉडेलनुसार विकसित करण्याचे ठरले

- मागच्या काळात दोन्ही संस्थांचे पीपीपी मॉडेलवर एकमत झाले नाही

- यातून एसटी बाहेर पडत ‘पीपीपी’ मॉडेलला नकार दर्शविल्याचे मेट्रोचे म्हणणे आहे

- आता तीन वर्षांच्या करार संपुष्टात येत आहे

- मेट्रोने शिवाजीनगर जागा परत देण्याची तयारी

- जून महिन्यात शिवाजीनगर बस स्थानकाची मोकळी जागा एसटीला परत दिली जाणार

- ही जागा परत देण्यात येत असल्याने मेट्रोने एसटीला भाडे तत्त्वावर दिलेली ‘आरे’ची जागा परत मागितली आहे

प्रवाशांचे काय होणार?

बस स्थानकाच्या जागे संदर्भात अनिश्चितता आहे. मात्र जून महिन्यांत मेट्रो कसल्या परिस्थितीत एसटीला रिकामी जागा देणार आहे. नव्याने बस स्थानक बांधायचे असेल तर किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. इथे केवळ एक महिन्याचा कालावधी मिळत आहे. एक महिन्यात बस स्थानक दुसरीकडे देखील स्थलांतर करणे शक्य नाही. बस स्थानकासाठी लागणारी एवढी मोठी जागा, त्याचे भाडे एसटीला आता परवडणारे नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दरम्यान प्रवाशांचे काय होणार?

जून महिन्यात राज्य परिवहन महामंडळासोबत झालेला करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे आम्ही शिवाजीनगरची जागा एसटीच्या ताब्यात देत आहोत. त्यामुळे वाकडेवाडीच्या बस स्थानकाचे भाडे आम्ही भरणार नाही. त्यांनी ती जमीन आरेला परत देऊन टाकावी असे आम्ही पत्र देत आहोत.

- हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, एचआर

वाकडेवाडी बस स्थानकाचा विषय हा विभाग स्तरावरचा नाही. त्यामुळे त्याच्या बाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. या बाबतच लवकरच मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11492 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneSTAgreementMaha Metro
go to top