पीएमपी सुरूच ठेवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपी सुरूच
ठेवण्याची मागणी
पीएमपी सुरूच ठेवण्याची मागणी

पीएमपी सुरूच ठेवण्याची मागणी

sakal_logo
By

पुणे ः एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्याचे कारण देत शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती (कारेगाव) येथपर्यंत पीएमपीएमएलची बस सेवा बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, रांजणगाव औद्योगिक वसाहत व कारेगाव बस फेरीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही पीएमपीएमएलची बससेवा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या पत्राची प्रत पीएमपीएमएलचे व्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे देण्यात आली आहे. १२ डिसेंबर २०२० पासून वाघोली ते रांजणगाव एमआयडीसी (कारेगाव) ही बस सुरू झाली असून आजतागायत चालू आहे. स्थानिक नागरिक, एमआयडीसीतील कामगार शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा या बसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बस बंद झाल्यास गैरसोय होऊ शकते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11566 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top