कोंढव्यात सावकाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढव्यात सावकाराला अटक
कोंढव्यात सावकाराला अटक

कोंढव्यात सावकाराला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः व्याजाच्या पैशांसाठी शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या खासगी सावकाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली. रवी पवार (वय ३८, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्रिशिलसिंह रुद्राजीराव राजे महाडीक (वय ४६, रा. हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या पत्नीने आरोपी पवार यांच्याकडून १ लाख रुपये १२ टक्के व्याज दराने घेतले होते. आरोपीने सिक्युरिटी म्हणून दोन चेक घेतले होते. तसेच ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हात उसने अडीच लाख घेतले, असे लिहून घेतले होते. प्रत्यक्षात फिर्यादी यांना २५ हजार रुपये व त्यांच्या पत्नीला २८ हजार दिले. उरलेली रक्कम व्याजाचा हप्ता, वकिलांची फी, स्टॅम्प खरेदी आदीसाठी पैसे कापून घेतले. फिर्यादी यांनी पवार याला एप्रिल २०२२ पर्यंत चार लाख ८० हजार रुपये व्याज दिले आहे. यानंतरही व्याजाचे पैसे देण्याची मागणी करत आरोपीने शिवीगाळ आणि धमकी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11663 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top