राजेश दातार यांची मैफील रंगली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश दातार यांची मैफील रंगली
राजेश दातार यांची मैफील रंगली

राजेश दातार यांची मैफील रंगली

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः संस्कार भारतीच्या पुणे महानगरातर्फे आयोजित मासिक संगीत सभेत राजेश दातार यांची सुश्राव्य मैफील सादर झाली. ‘जावो श्याम’ ही बंदिश, तराणा, ‘बरसन लागी सावन बुंदिया’ ही ठुमरी, ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग त्यांनी सादर केले. संत सुरदास यांच्या ‘सबसे उँची प्रेम सगाई’ या भजनाने त्यांनी मैफिलीची सांगता केली. त्यांना संवादिनीवर डॉ. नरेंद्र चिपळूणकर तर तबल्यावर अमित जोशी यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाला ओंकारेश्वर देवस्थानाचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, अखिल भारतीय प्रांत प्रचारक तिवारी संस्कारभारती पश्चिम प्रांत कार्याध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, संस्कारभारती पुणे महानगर संरक्षक सदस्य पं. अतुलकुमार उपाध्ये आदी उपस्थित होते. विनायक माने यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री देवी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11683 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top