सेंट जोसेफ क्लबचे जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट जोसेफ क्लबचे जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश
सेंट जोसेफ क्लबचे जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश

सेंट जोसेफ क्लबचे जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश

sakal_logo
By

पुणे ः पिंपरी-चिंचवड जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक संघटनेतर्फे आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धेत सेंट जोसेफ स्पोर्ट्स क्लबने सुवर्ण यश संपादन केले आहे. महाळुंगे-बालेवाडी स्टेडिअममध्ये आयोजित या स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात क्लबच्या जयवर्धन हर्षवर्धन पवार (इयत्ता दुसरी) व प्रणीत मोहित गायकवाड (इयत्ता तिसरी) या दोन्ही विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले. या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षक गणेश भिसे यांनी प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना क्लबचे समन्वयक स्नेहांकिता अमित संताने, क्लबचे संस्थापक सुमेरचंद अगरवाल यांनी मुलांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.