Sat, March 25, 2023

हिंदी शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
हिंदी शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
Published on : 19 May 2022, 1:57 am
पुणे, ता. १९ : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्यावतीने राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रम पाचगणी-महाबळेश्वर येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास गुरुवारी सुरुवात झाली. कार्यक्रमात राज्यातील हिंदी भाषेचे उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यभरातील किमान २०० शिक्षक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त शिक्षण संघटनांचे योगदान या विषयावर चर्चासत्रे, हिंदी काव्यवाचन असे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते नितीन भिलारे, गिरीश दापकेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.