खोटे दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देत बँकेलाच गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोटे दागिने खरे असल्याचे 
प्रमाणपत्र देत बँकेलाच गंडा
खोटे दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देत बँकेलाच गंडा

खोटे दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देत बँकेलाच गंडा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः बँकेच्या गोल्ड व्हॅल्युअरने कर्जदारांशी संगनमत करून खोटे दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन अहमदनगर शहर सहकारी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर २०२० ते १६ नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला.

याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी मंदार सुरेश सुभेदार (वय ४६, रा.सिंहगड रस्ता) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित कुलकर्णी, मारुती सूर्यवंशी, सुनील कदम, वैजयंती कदम, केतन अमराळे, सनी बलकावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कुलकर्णी हे बँकचे गोल्ड व्हॅल्युअर आहेत. त्यांनी बँकेच्या कर्जदारांशी संगनमत केले. इतर आरोपी यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने हे खोटे असल्याचे त्यांना माहिती होते. तरीही त्यांनी ते खरे असल्याचे भासवून बँकेला हे दागिने खरे असल्याबाबत बनावट प्रमाणपत्र दिले. कर्जदारांनी हे दागिने बँकेकडे गहाण ठेवले. त्याबदल्यात बँकेने २२ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज दिले. प्रत्यक्षात कर्जफेड न झाल्याने बँकेने दागिन्यांची तपासणी केली. तेव्हा ते खोटे असल्याचे आढळून आल्याने आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y23812 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..