सोफोश संस्थेत दोन मुले दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोफोश संस्थेत दोन मुले दाखल
सोफोश संस्थेत दोन मुले दाखल

सोफोश संस्थेत दोन मुले दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः वडगाव बुद्रूक-तुकाईनगर समाज मंदिरामागील महिला स्वच्छतागृहाजवळ दोन महिन्याचा मुलगा सापडल्याची माहिती सिंहगड पोलिस ठाण्याने दिली. त्यानंतर त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार, सोफोश संस्थेत काळजी व संरक्षणासाठी दाखल केले. पुष्पराज असे त्याचे ठेवले आहे. या मुलाची आई छाया प्रकाश घोरपडे (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिची आता जामीनावर सुटका झाली असून ती बेपत्ता असून तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नाही.

जन्मदाती आई रूबी शेख (वय ३५) ही बदामी हौद परिसरात एक ते दोन महिन्याच्या मुलीला पिशवीमध्ये गुंडाळून घेऊन जाताना खडक पोलिसांना आढळून आली. रूबी या मनोरुग्ण असून बुधवार पेठ एवढाच पत्ता सांगत आहे. तिच्या मुलीला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सोफोश संस्थेत दाखल केले आहे. मुलीचे नाथ प्रथा ठेवले आहे.
संबंधित महिलांचे पालक, नातेवाईक अथवा त्यांना ओळखत असलेल्यांनी तत्काळ त्या-त्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा किंवा ससून रुग्णालय, सोफोश संस्था आणि ०२०-२६२४६६०१, ०२०-२६१२८२१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y24995 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..