वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः शहरासह उपनगरांमधील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठ रस्ता, बाणेर रस्ता, औंध- खडकी रस्ता, वाकडेवाडी रस्ता, खराडी बाय पास रस्ता, नगर महामार्ग, कात्रज रस्ता आदी रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.

सकाळी पावसामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आधीच वाहतूक कोंडी होते. त्यात आता पावसाची भर पडत असल्याने साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना रस्ता शोधावा लागत आहे, तसेच प्रमुख रस्त्यावरील मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मेट्रो मार्गावर काम सुरु असल्याने अनेक ठिकाणांवरील वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आले असून वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे देखील कोंडी होत आहे. शिवाजी नगर- हिंजवडी मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे औंध, बाणेरकडून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. बाणेर रस्त्यावरील सकाळनगर, अभिमान श्री सोसायटी, यशदा या भागात वाहतूक कोंडी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25081 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..