नदी पात्रातील रस्ता बंद झाल्याने कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदी पात्रातील रस्ता बंद झाल्याने कोंडी
नदी पात्रातील रस्ता बंद झाल्याने कोंडी

नदी पात्रातील रस्ता बंद झाल्याने कोंडी

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्याने नदी पात्रातील रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, लालबहादूर शास्त्री तसेच एस. एम. जोशी पूल आणि म्हात्रे पुलावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र बुधवारी दुपारी दिसत होते.

शहरात पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सकाळी सुरू करण्यात आला. त्याचा फटका शहरातील वाहतुकीला बसला. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, कोथरूड येथून शहरात येणाऱ्या दुचाकी स्वारांकडून नदी पात्रातील रस्त्याचा वापर करता केला जातो. सकाळी दहा वाजता खडकवासला धरणातून विसर्ग वाढल्याने नदी पात्रातील रस्त्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे एस. एम. जोशी पुलाच्या खालून दुचाकी स्वारांनी गाड्या परत मागे वळविल्या. ते म्हात्रे पूल किंवा एस. एम. जोशी पुलाच्या दिशेने वळाले. या पुलावर गर्दी झाल्याने दुपारी काही वेळ येथे वाहतूक कोंडी झाली होती.
विद्यार्थिनी समीक्षा देशमुख म्हणाल्या, “सिंहगड रस्त्याने नदी पात्रात आल्यानंतर रस्त्यावर पाणी दिसले. त्यामुळे परत फिरून म्हात्रे पुलाच्या बाजूला गेले. पण तेथे वाहतूक कोंडी होती. तीच परिस्थिती डेक्कनच्या परिसरात होती.”

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25082 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..