Pune : बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनतर्फे साखळी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune BSNL Employees Union Agitation
बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनतर्फे साखळी आंदोलन

Pune : बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनतर्फे साखळी आंदोलन

पुणे : बीएसएनएलचे राष्ट्रीय मुद्रीकरण, पाइपलाइन सार्वजनिक निर्गुंतवणूक व खाजगीकरण नरेंद्र मोदी सरकारद्वारे केले जात आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनने स्वारगेट, शिवदर्शन चौक, महाराणा प्रतापसिंह उद्यान चौक बाजीराव रोड, आणि अलका टॉकीज चौक येथे मानवी साखळी आंदोलन केले.

जिल्हा अध्यक्ष युसूफ जकाती, जिल्हा सचिव विकास कदम, जिल्हा कोषाध्यक्ष गणेश भोज, संदीप गुळुंजकर, नितीन कदम, नफीस काझी, नरेंद्र माने, आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. १४ हजार ९१७ टॉवर्स तसेच ऑप्टिक फायबर, बीएसएनएलचे २,८०,००० किलोमीटर लांबीचे ऑप्टिक फायबरचे खाजगीकरण, बीएसएनएलच्या फोरजी लॉन्चिंगमध्ये निर्माण होणारे रोड ब्लॉक, भारतीय कंपन्यांकडून फोरजी उपकरणे खरेदीचे आदेश, बीएसएनएलनचे १४, ९१७ मोबाईल टॉवर्स खासगी कंपन्यांना देण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी युनियनने आंदोलन केले आहे, असे जकाती यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25120 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..