वेदांतासारख्या कंपन्या महाराष्ट्रातून जाणे अयोग्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेदांतासारख्या कंपन्या महाराष्ट्रातून जाणे अयोग्य
वेदांतासारख्या कंपन्या महाराष्ट्रातून जाणे अयोग्य

वेदांतासारख्या कंपन्या महाराष्ट्रातून जाणे अयोग्य

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : ‘वेदांता-फॉक्सस्कॉनसारखे प्रकल्प महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जाणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्या जाणार आहेत. हा विषय राजकीय न करता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घरोघरी भेटी देणे बंद करून या गंभीर विषयावर चर्चा करून मार्ग काढावा.’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार झोडपले.

मतदार संघातील विविध विषयांबाबत सिंचन भवन येते खासदार सुळे यांनी भेट घेऊन आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘या विषयावर राजकारण करणे चुकीचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन लढले पाहिजे. प्रकल्प कुठल्याही राज्यात जायला हरकत नाही. मात्र, महाराष्ट्रातून तो गेला हे दुःखाचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरोघरी भेटी बंद करून इकडे लक्ष द्यावे आणि इतर दौरे रद्द करून या गंभीर प्रश्नावर चर्चा करावी. हा प्रकल्प राज्यातून गेल्याने जवळपास एक लाख नोकऱ्या जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे.’ दरम्यान, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी खासदार सुळे यांच्या नेत्तृत्त्वाखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर युवा सेनेच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. एक लाख ५८ हजार कोटींची गुंतवणूक आणि एक लाख तरूणांचा रोजगार पळवून नेल्याचे सांगत या वेळी युवा सेनेच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25124 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..