विद्यापीठात उद्या दलित पँथरवर चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात उद्या दलित पँथरवर चर्चासत्र
विद्यापीठात उद्या दलित पँथरवर चर्चासत्र

विद्यापीठात उद्या दलित पँथरवर चर्चासत्र

sakal_logo
By

पुणे, ता. ः दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. १६) विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्‍घाटन सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. सदर कार्यक्रम विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच दुपारी १२ ते दीड यावेळेत माजी विधानपरिषद सदस्य जयदेव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र पार पडेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, समाजशास्त्र विभाग आणि साधना साप्ताहिकाचे वतीने आयोजित या चर्चासत्रात जे. व्ही. पवार, अर्जुन डांगळे, सुरेश सावंत हे वक्ते चर्चेत सहभागी होणार आहे.
दुसरे सत्र ‘दलित पँथरचे योगदान : चर्चा आणि चिकित्सा’ या विषयावर असून दुपारी अडीच ते चार या वेळेत होईल. या सत्राचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले असणार आहे. या सत्रासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे, अरुण खोरे, मधू कांबळे हे वक्ते चर्चेत सहभागी होणार आहे. सायंकाळी चार वाजता या चर्चासत्राचा समारोप होईल. माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून समारोप प्रसंगी उपस्थित राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25157 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..