वारजे माळवाडीत जुगार आड्ड्यावर छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारजे माळवाडीत जुगार आड्ड्यावर 
छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल
वारजे माळवाडीत जुगार आड्ड्यावर छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल

वारजे माळवाडीत जुगार आड्ड्यावर छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः वारजे माळवाडी परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत २२ जणांवर गुन्हा दाखल झाला असून २१ जणांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत रोकड, जुगाराचे साहित्य असा एकूण ३३ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वारजे माळवाडी परिसरात बेकायदेशीर मटका, जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेऊन जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी २१ जण मटका, सोरट, चक्री खेळत असल्याचे आढळून आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर मधील सचिन बोडके यांच्या पडीक इमारतीच्या मोकळ्या पार्किंगच्या जागेत काहीजण पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत होते. याप्रकरणी ताब्यातील २१ आणि फरार मटका अड्ड्याचा मालक अशा एकूण २२ जणांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25158 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..