अतिवृष्टीत साडेपाच हजार हेक्टर पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीत साडेपाच हजार हेक्टर पिकांचे नुकसान
अतिवृष्टीत साडेपाच हजार हेक्टर पिकांचे नुकसान

अतिवृष्टीत साडेपाच हजार हेक्टर पिकांचे नुकसान

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आठ तालुक्यांमध्ये झालेल्या ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसामुळे साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे तर ८३ घरांची पडझड झाली आहे. याशिवाय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून रस्ते, बंधारे वाहून गेले आहेत. तसेच नऊ जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली असून तब्बल २० हजार कोंबड्या दगावल्या आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यात १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ४१ घरांची पडझड झाली असून दोन शेळ्या, एक बोकड, आठ हजार कोंबड्या दगावल्या आहेत. तसेच १०२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मोरगावमधील खटकळी ओढ्यावरील बंधारा वाहून गेला आहे. जुन्नर तालुक्यात सहा घरांची पडझड झाली असून सोमतवाडी येथे पाच हजार कोंबड्या, ओतूर येथे ६६०० आणि पिंपरी पेंढार येथे १२७५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वेल्हे तालुक्यात २६ घरांची पडझड झाली असून एक जनावर दगावले आहे. खेड तालुक्यात तीन घरांची पडझड झाली असून पुरंदर तालुक्यात सात घरांचे नुकसान झाले आहे. तसेच तीन शेळ्या, दोन जनावरे आणि ४००० कोंबड्या दगावल्या आहेत. या ठिकाणी १०७ हेक्टर, तर दौंड तालुक्यात १५२ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात १, ६ आणि ७ सप्टेंबर या तीन दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. जुन्नर तालुक्यातील आठ मंडळे, आंबेगाव, दौंड प्रत्येकी एक मंडळ, पुरंदर आणि मावळ प्रत्येकी तीन मंडळे, खेड सहा मंडळे, बारामती एक, तर इंदापूर दोन मंडळ अशा एकूण १०० मंडळांपैकी २५ मंडळांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १८२ घरांचे नुकसान झाले असून दहा घरे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत. तसेच ५३१४ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून लवकरच राज्य सरकारकडे भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.
- संजय तेली, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी
----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25214 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..