श्री श्री तत्त्वाच्या औषधाने कोरोनावर उपचार शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री श्री तत्त्वाच्या औषधाने
कोरोनावर उपचार शक्य
श्री श्री तत्त्वाच्या औषधाने कोरोनावर उपचार शक्य

श्री श्री तत्त्वाच्या औषधाने कोरोनावर उपचार शक्य

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १५ ः श्री श्री तत्त्वच्या ‘एनएओक्यू १९’ या औषधाला आयुष मंत्रालयाने सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोरोनावर उपचार करण्यासाठी नुकतीच मान्यता दिला आहे. ही अनुमती एम्स जोधपूर, जीआयएमएम नोईडा आणि एम्स ह्रषिकेश या मान्यताप्राप्त संस्थांनी प्रयोगशाळांतील चाचण्यांनंतर दिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
यासंदर्भात श्री श्री इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स रिसर्चचे कार्यकारी अध्यक्ष कांचीमोटला म्हणाले, ‘‘देशातील अनेक मान्यताप्राप्त संस्थांनी ‘डबल ब्लाईंड’ या पद्धतीने ५५० पेक्षा अधिक रुग्णांवर प्रयोग केले. यात हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.’’ या औषधाने सौम्य व मध्यम कोरोना झालेल्यांच्या लक्षणांमध्ये वेगाने सुधारणा झाल्याचे दिसून आले व त्यांची खूप कमी कालावधीमध्ये रुग्णालयातून सुटका झाली. औषधाचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. श्री श्री तत्त्वचे मुख्य विज्ञानविषयक अधिकारी डॉ. एम. रविकुमार रेड्डी म्हणाले, ‘‘आम्ही तयार केलेल्या औषधातील सर्व सामग्री अनेक चाचण्यांनंतर निवडली गेली आहे. औषधाच्या सुरक्षा आणि परिणामकारतेसाठी अनेक पातळ्यांवर विश्लेषण केले आहे. या औषधाच्या उपयोगाबद्दल आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत.’’
----------------------------------
श्री श्री तत्त्वचे कोरोनावरील औषध सादर करताना डॉ. एम. रविकुमार रेड्डी व व्यवस्थापकीय संचालक अरविंद वर्चस्वी.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25276 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..