ग्राहक आयोगातील सुनावणी ऑनलार्इन होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहक आयोगातील सुनावणी ऑनलार्इन होणार
ग्राहक आयोगातील सुनावणी ऑनलार्इन होणार

ग्राहक आयोगातील सुनावणी ऑनलार्इन होणार

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : ग्राहक आयोगात दाखल होणारी प्रकरणे लवकर निकाली लागावीत, तसेच सुनावणीसाठी लागणारा वेळ कमी होऊन येण्या-जाण्याचा खर्च वाचावा यासाठी येत्या सहा महिन्यांत ग्राहक आयोगातील सुनावणी ऑनलार्इन होणार आहे. त्यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर आयोगातील कामकाज ऑनलार्इन झाले होते. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर आता पुन्हा ऑफलार्इन कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा ऑनलार्इन सुनावणी घेण्याची मागणी तक्रारदार आणि वकील संघटनांकडून होत होती. त्याची दखल घेत केंद्रीय ग्राहक खात्यातील सचिव रोहित कुमार सिंह यांनी नुकताच निर्णय दिला आहे. त्यानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोगातील सुनावणी ऑनलार्इन सुरू करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात त्यासाठी एक ॲप्लिकेशन तयार येर्इल.

दिल्लीवारी थांबणार

जिल्हा आणि राज्य आयोगात दाखल असलेल्या तक्रारीच्या सुनावणीसाठी उपस्थित राहणे ग्राहक आणि वकिलांना काहीसे सोर्इचे ठरते. मात्र प्रकरण जर केंद्रीय आयोगात असेल तर दिल्लीला जावे लागते. ठरलेल्या तारखेला वकील व तक्रारदार हजर झाला आणि दुर्दैवाने सुनावणी झाली नाही तर तक्रारदाराला मोठा भुर्दंड सहन करावा लागत. ऑनलार्इन सुनावणीमुळे खूप कमी वेळा वकिलांना दिल्लाला जावे लागणार आहे.


ऑनलार्इन सुनावणी सुरू करण्याबाबत आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होतो. त्यापार्श्‍वभूमिवर घेतलेला हा निर्णय अत्यंत चांगला आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील ग्राहकांना होर्इल. त्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचेल. या निर्णयाची लवकर अंमलबजणी करावी.
-ॲड. ज्ञानराज संत, उपाध्यक्ष, कन्झ्युमर ॲडव्होकेट्स असोसिएशन

आयोगाच्या स्थापनेपासून तक्रारींची स्थिती :
आयोग- दाखल तक्रारी- निकाली तक्रारी- प्रलंबित तक्रारी- निकालाची टक्केवारी
राष्ट्रीय आयोग - १४०७१२ -११८५४२ - २२१७० - ८४.२४%
राज्य आयोग - ८७८७७९- ७६५६१४- ११३१६५- ८७.१२%
जिल्हा आयोग - ४८२६८२५ - ४३२७४१९- ४९९४०६- ८९.६५%
एकूण - ५८४६३१६ - ५२११५७५- ६३४७४१- ८९.१४%

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25281 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..