शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवायेच कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवायेच कधी?
शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवायेच कधी?

शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवायेच कधी?

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : शिक्षण विभागाकडून सातत्याने येणारे सरकारी आदेश आणि त्याच्या अंमलबजावणीची शिक्षकांवर येऊन पडणारी जबाबदारी, त्यामुळे शाळेतील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अडथळा येत आहे, असे सांगत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षिकेने थेट शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली आहे.

शिक्षिका वैशाली गेडाम यांनी शिक्षकांच्या खांद्यावरील अशैक्षणिक कामांचे ओझे आणि शिक्षकांची व्यथा पत्राद्वारे मांडली आहे. हे पत्र समाज माध्यमावर अनेक ठिकाणी व्हायरल झाले. विद्यार्थ्यांवर येऊन आदळलेला ‘अध्ययन स्तर निश्चिती’ हा कोणत्या शैक्षणिक अजेंड्याचा भाग आहे, हे समजण्यास काहीही वाव नाही. शिक्षकांना खूप प्रशिक्षणे मिळाली, परंतु त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकविण्याची मोकळीक हवी की नको? शासनाचे सर्व सरकारी आदेश शिक्षकांवर येऊन आदळतात. एकामागून एक आदेश येत असतील, तर त्याप्रमाणे पुर्तता करत असताना मुलांना वर्गात शिकवायचे कधी? असे असंख्य प्रश्न गेडाम यांनी उपस्थित केले. शाळेतील उपक्रम शासनाने राबवायचे असतात की शिक्षकाने?, शिक्षकांच्या गुणवत्तेवर शासनाला विश्वास नसेल, तर राज्याच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार कशी?, असा प्रश्न गेडाम यांनी उपस्थित केला.

शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संपर्क जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. परंतु शालाबाह्य कामांमुळे शिक्षणाच्या मूळ प्रक्रियेलाच धक्का बसत आहे. वेळोवेळी फक्त शालाबाह्य कामे कमी करण्यात येतील अशा घोषणा केल्या जातात. पण, प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नाही. याशिवाय विविध खात्याच्या महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करण्यासाठी त्यांना शिक्षकच दिसतो.
- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25465 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..